ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकाचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी : आ. अडबाले

शिक्षकदिनानिमित्त जिल्हा आदर्श शिक्षक सन्मान सोहळा

चांदा ब्लास्ट

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे आयोजन

चंद्रपूर : शिक्षक हा समाज घडवणारा शिल्पकार आहे. शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांचे कार्य लक्षवेधी आहे. नव्या पिढीला दिशा देण्यासाठी सातत्याने शिक्षक झटत असतो. त्यामुळे शिक्षक सेवानिवृत्त झाला तरी कधीही माजी होत नाही. तो आजीवन शिक्षकच असतो. त्‍यामुळे समाज घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, चंद्रपूर यांच्या वतीने व गोविंद मैना फाऊंडेशन चंद्रपूरच्या सौजन्‍याने शिक्षकदिनानिमित्त “जिल्हा आदर्श शिक्षक सन्मान सोहळा २०२५” धनोजे कुणबी सभागृृह चंद्रपूर येथे रविवारी पार पडला. या कार्यक्रमात अध्यक्षस्‍थानावरून आमदार अडबाले मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, गोविंद मैना फाउंडेशनचे अध्यक्ष सौ सीमा अडबाले, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सदस्य लक्ष्मणराव धोबे, प्रवीण नाकाडे, प्राचार्य डॉ. अनिल शिंदे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, वर्धा जिल्ह्याचे कार्यवाह महेंद्र सालंकार, प्रा. डॉ. संजय गोरे, प्रा. डॉ. प्रवीण जोगी, अरविंद राऊत, विनोद पिसे, प्रा डॉ. प्रवीण चटप, प्रा. प्रमोद उरकुडे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील शेरकी, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे, महानगरचे अध्यक्ष दिगंबर कुरेकर, कार्यवाह सुरेंद्र अडबाले, एम.डी. धनरे, राहूल अडबाले यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात प्रा. डॉ. दिलीप चौधरी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षकांची भूमिका, आव्हाने व शिक्षण क्षेत्रातील घडणारे बदल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जागतिक पातळीवरील आव्हाने स्वीकारण्यासाठी एनएपी 2020 हे जरी आकर्षक गाजर दाखवत असले तरी मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती ही वेगळी आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी पुरेसे संसाधने, सुविधा अजूनही उपलब्ध नाहीत. हजारो जागा शिक्षकांच्या रिक्त आहेत. अशा परिस्थितीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी कशी होणार? मराठी माध्यमांच्या शाळा उध्वस्त होत आहेत. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था उध्वस्त होत आहे. अशा स्थितीमध्ये कॉन्व्हेंट संस्कृतीमध्ये गोरगरिबांची, बहुजनांची मुलं भविष्यात तग धरतील काय? असा प्रश्न उपस्थित केला व शिक्षकाने जागरूकतेने मुलांना भविष्यातील आव्हाने ओळखून ज्ञान देण्याचे आवाहन केले.

उद्‍घाटनीय मनोगतात माजी आमदार श्री. डायगव्हाणे यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले व समाजामध्ये आपली जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळे घरात आणि घराबाहेर सुद्धा आपले कर्तृत्व हे आदर्श असले पाहिजे याची जाणीव ठेवावी, असे प्रतिपादन केले. तसेच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या कर्तृत्वामुळे व नेतृत्वामुळेच आज शिक्षकांना सन्मानाचे स्थान त्यांचे अधिकार मिळाले आहेत. याची जाणीव ठेवून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघासाठी एक दिलाने काम करण्याचे आवाहन केले.

या सोहळ्यात जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधून निवड करण्यात आलेल्या उत्कृष्ट १५ शिक्षकांचा, तसेच उत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट मुख्याध्यापक, आदिवासी, विजाभज, कॉन्व्हेंट विभागातील उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. एकूण ३५ मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्‍छ, सन्‍मानपत्र, भेटवस्‍तू देऊन सपत्‍नीक सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रभाकर पारखी यांनी केले. बहारदार संचालन आनंद चलाख व रूपाली मुंगल यांनी केले. आभार प्रदर्शन महानगरचे कार्यवाह सुरेंद्र अडबाले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्‍हा, महानगर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या शिक्षकांचा केला सन्‍मान

दि एज्‍यूकेशन सोसायटी, चंद्रपूर (संस्‍था), डॉ. जे. एम. काकडे, डॉ. सतीश कन्नाके, प्रा. प्रकाश गौरकार, राजेश सावरकर, अमित देहारकर, प्रेमानंद देशमुख, जितेंद्र टोंगे, शिवाजी नागरे सर, श्री. जगदीश ठाकरे सर, श्री. मंगेश देविदास बोढाले सर, रतन शिखरे, प्रशांत लढी, कु. वर्षा मोरेश्‍वर सुरकर, सतीश राठोड, सुरेश पाटील, कु. संगीता ढोके, प्रा. किसन वासाडे, अमरसिंह बघेल, मोहनदास मेश्राम, डॉ. धर्मा गावंडे, प्रेमदास मेंढुळकर, प्रविण गेडाम, अनिल पेटकर, सुदर्शन बारापात्रे, डॉ. सुफी शेहमीना सबा, श्रीमती गीता महेशकर, किशोर उईके, अक्षता मोगरे, निलेश दुर्योधन, प्रभाकर पारखी, सतीश मेश्राम, हरिहर खरवडे, प्रा. ज्ञानेश्‍वर सोनकुसरे, श्रीमती आसमा खान मॅडम यांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये