ताज्या घडामोडी

सुषमा अंधारेंचे हेलिकॉप्टर कोसळले – अंधारे सुरक्षित

तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना महाड येथे घेण्यास आलेले हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत. अपघात झाला त्यावेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या. केवळ पायलटच त्यामध्ये होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप समजले नाही.

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी राज्यभरात सुषमा अंधारे फिरत आहेत. त्यांची काल कोकणात सभा होती. त्यानंतर आज त्या बारामतीकडे जाणार होत्या. त्यासाठी त्यांना घेण्यासाठी महाडमध्ये हेलिकॉप्टर आले होते. परंतु ते हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. सुदैवाने सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले. सुषमा अंधारे यांनी आपण सुखरुप असल्याचे म्हटले आहे. या अपघातामध्ये पायलट सुखरुप आहे.

सुषमा अंधारे सकाळी सकाळी 9.30 वाजता महाडमधून बारामतीकडे हेलिकॉप्टरने जाणार होत्या. त्यासाठी त्या हेलिपॅडवर आल्या होत्या. परंतु त्यापूर्वी अपघात झाला. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते कोसळले आहे. अखेरीस त्या मोटारीने रस्तामार्गे बारामती कडे रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. तांत्रिक तपासानंतर अपघाताचे कारण समोर येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये