ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर नरभक्षक वाघीण जेरबंद ; पाथरी परिसरातील घटना

दोन दिवसापुर्वी शेतकऱ्याला केले होते ठार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

मागील दोन दिवसापुर्वी सावली वनपरिक्षेत्रांतर्गत पाथरी उपवनक्षेत्रात पांडुरंग भिकाजी चचाणे या शेतकऱ्यास वाघीणीने ठार केले होते. त्या वाघीणीचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी धरली असल्याने शेवटी वनविभागाने मोठया परीश्रमाने वाघीणीला (दि. 7) रोजी सायंकाळच्या सुमारास जेरबदं केले. सदरची वाघीन अंदाजे तीन वर्षाची असल्याची सुत्राची माहिती आहे.

तालुक्यात वाघाचा धुमाकुळ सुरु असुन शेतीचा हंगामात शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. वाघाच्या दहशतीत शेतीचे कामे सुरु असुन शेतावर जाण्यासाठी शेतकरी भयभीत झालेले आहेत. दोन दिवसापुर्वीच पाथरी उपवनक्षेत्रात शेतात काम करीत असतांना शेतकऱ्याला वाघीणीने ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने कंबर कसुन पिंजरे लावुन वाघीणीला जेरबंद केले. यामुळे परिसरातील नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला.

सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक रामानुजन, विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वात जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे, डॉ. कुंदन पोडशेलवार, चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगमकर, क्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पाटील, वनसंरक्षक अविनाश नान्हे, एकनाथ खुळे, दिनकर कराड, विनोद उईके, आर.आर.यु. टीम व पिआरटी टिम आदीनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये