गर्जुना आवश्यक असणाऱ्या वस्तुँचा पूर्वठा ही समाजाला खरी मदत देणे आहे – पालमंत्री डॉ पंकज भोयर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : आज वर्धा येथे निर्मिक ग्रामीण विकास व बहुउद्देशीय संस्था, लायन्स क्लब वर्धा लिजेंड्स आणि दत्ता मेघे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य सामाजिक उपक्रम पार पडला. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यासोबतच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमचे अध्यक्ष माजी मंत्री व माजी खासदार व कुलपति श्री दत्ताजी मेघे होते,तर प्रमुख पाहुणे राज्यमंत्री व पालकमंत्री डॉ पंकज भोयर होते.विशेष अतिथि म्हणून निर्मिक ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा जया अंभोरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक लायन्स क्लब वर्धा लीजेंड्सचे अध्यक्ष आणि दत्ता मेघे विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. वरुण पांडे आणि लायन्स क्लब लीजेंड्सचे प्रशांत पांडे हे प्रामुखयाने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात अनाथ आश्रमाचे विद्यार्थ्यांना स्कुल बॅग आणि वह्यांचे वाटप करून करण्यात आली. शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे या भावनेतून अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचविण्यात आली.
गरजू आणि ग्रामीण भागातील मुलांना हे साहित्य मिळाल्याने त्यांच्या शिक्षण प्रवासात प्रोत्साहन मिळणार आहे.कार्यक्रमादरम्यान, वृद्धाश्रमातील वृद्धांना मदत म्हणुन स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले.
यानंतर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात आपले संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. हेल्थ वारियर्स म्हणून काम करणारे डॉक्टर, नर्सेस तसेच कोरोना काळात व इतर आव्हानात्मक परिस्थितींमध्ये निरंतर सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना विशेष सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांचा निस्वार्थी त्याग, सेवाभाव आणि समाजासाठी केलेले कार्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी या कर्यक्रमांची स्तुति केली व ते म्हणाले की समाजा मधे ज्या वस्तुँची देण्याची जी गरज आहे त्या वस्तुँचा पूर्वठा या कार्यक्रमातुन केला जात आहे व असे सामाजिक कार्य नेहमीच सुरु असायला पाहिजे.
माजी खासदार व कुलपति दत्ता मेघे अध्यक्षीय भाषणत म्हणाले की समाजाच्या कल्याणासाठी चांगले काम सुरू ठेवले पाहिजे आणि जीवनात सामाजिक कार्य करताना त्यातून आपल्याला काय मिळेल याचा विचार करू नये तर लोकांच्या कल्याणासाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे म्हणून आपण ते कार्य करत राहावे तसेच त्यांनी आयोजकाना या आयोजनासाठी शुभेच्छा दिले.
या सोहळ्यामुळे समाजातील सेवाभावी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले. मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यातून त्यांना मिळालेल्या साहित्याचा आनंद दिसून आला, तर गौरव मिळालेल्या डॉक्टर, नर्सेस आणि शिक्षकांच्या डोळ्यात अभिमानाची चमक दिसत होती. समाजातील प्रत्येक घटक एकमेकांच्या सोबत उभा राहिला, तरच खरी सामाजिक उन्नती साध्य होईल हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी लायन्स क्लब लीजेंड्सचे अध्यक्ष आणि दत्ता मेघे विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री. वरुण पांडे, प्रशांत पांडे, ऐड आशीष मेश्राम,प्रा खुशबु पांडे,शुभम राउत,अमोल कठाने,सूरज रायकवार, रोहित वानखेड़े,रवि संगतानी, संदीप विधानी यांनी अथक परिश्रम घेतले.