गडचांदूर भाजपचे अध्यक्ष अरविंद डोहे यांचेकडून गडचांदूर शहर मंडळ कार्यकारणी जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
भारतीय जनता पार्टी गडचांदूर शहर मंडळाचे अध्यक्ष अरूण डोहे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या सुचनेनुसार आज आपल्या गडचांदूर शहर मंडळाच्या भाजप कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नावे जाहीर केली आहेत.
त्यानुसार गडचांदुर शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदी भास्कर उरकुंडे, अरविंद कोरे, धर्मेंद्र सिंग, दिवाकर धनवलकर, संगीता आत्राम, दत्ता शेरे तर सरचिटणीस पदी हरिष घोरे, महेश घरोटे, सतीश बेतावार, रोहन काकडे,आणि चिटणीस पदी अंजली ताई बिस्वास, सुंदरा दाळे, पायल येलमुले, जयंता भोंगळे, रमेश चुदरी, धृपता काथवटे तर कोषाध्यक्ष पदी शंकर आपुरकर आणि सदस्य पदी विवेक भेदोळकर, हिरामण देवाळकर, संजय बोरडे, गणपत बुरडकर, रामचंद्र खामनकर, तानाजी देशमुख, अरुण विधाते, विठ्ठल धांडे, प्रशांत गौरशेट्टीवार, विनोद चौधरी, सुधाकर बोरीकर, राकेश अरोरा, विनोद वाघाडे, मारुती यापलवार, विजय रागीट, देविदास पेंदोर, दिलीप डोंगरे, परशुराम मुसळे, चंद्रकांत सोमवंशी, राजू गेडाम, सत्यदेव शर्मा, हेमंत पातुरकर, तुषार कलोडे, बळीराम ताळे, शाकीर अली, मारुती पारखी, जगन कापसे, कवडू वैरागडे, राकेश आसुटकर, विनोद कडू, शारदा पुसाटे, मायाबाई बामनवाडे, रेणुका भार्गव, छाया गेडाम,मीरा अशोक शुक्ला,अन्नु शर्मा, छबुताई बुरान, नैना चौधरी, शिल्पा भगत, किरण उईके, रोशनी इंगळे, त्रिवेना जगताप, शोभा उलमाले, माया चव्हाण व मनीषा भालेराव यांच्या नावांची घोषणा केली आहे.
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. अशोकजी उईके, माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहिर, आमदार देवरावदादा भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अरूण मडावी, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष अमर बोडलावार, भटक्या विमुक्त जाती सेलचे जिल्हाध्यक्ष हितेश चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, शहराध्यक्ष अरविंद डोहे, जेष्ठ नेते एल. डी. मोहितकर सर, महिला मोर्चाच्या जिल्हा महामंत्री विजयालक्ष्मी डोहे,शितल धोटे, अपर्णा उपलेंचवार,आदींनी अभिनंदन केले आहे.