ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीतील ८६४९.८०९ हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्याचे श्रेय सुभाष धोटे यांचेच : डॉ. अंकुश गोतावळे

पाटण येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक उत्साहात ; जिवतीवासीयांनी केले माजी आमदारांचे अभिनंदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती तालुक्यातील पाटण येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी संघटन बळकटीसह जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्याचा संकल्प व्यक्त केला. बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी जिवती तालुक्यातील ८६४९.८०९ हेक्टर जमीन वनक्षेत्रातून वगळण्यासाठी सुभाष धोटे यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले.

         यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगितले की, या भूमीमुक्तीचा खरे श्रेय हे फक्त व फक्त माजी आमदार सुभाष धोटे यांचेच आहे. त्यांनीच वारंवार शासन दरबारी प्रश्न लावून धरला आणि जिवतीवासीयांना दिलासा मिळवून दिला. तर जमिनींचे पट्टे, घरकुले, रस्ते अशा अनेक प्रश्नांवरही धोटे यांनी सातत्याने आवाज उठवून न्याय मिळवून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात माजी आ. सुभाष धोटे म्हणाले की, जिवतीतील जमिनी वनक्षेत्रातून वगळण्यासाठी आणि इतर अनेक प्रश्नांवर आम्ही पदाधिकारी व नागरिकांना घेऊन शासन दरबारी सातत्याने लढा दिला. हा यशाचा प्रवास फक्त माझा नाही, तर आपल्या सर्वांच्या एकजुटीने शक्य झाला आहे. आता हे श्रेय जनतेपर्यंत पोहोचवणे आणि पक्ष संघटन अधिक बळकट करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे असा विश्वास व्यक्त केला.

       या बैठकीला तालुकाध्यक्ष डॉ. अंकुश गोतावळे, जेष्ठ काँग्रेस नेते भीमराव पा. मडावी, प्रा. सुग्रीव गोतावळे, माजी अध्यक्ष गणपत आडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदाताई मुसणे, गीताताई चव्हाण, सुमनबाई शेळके,उत्तम कराळे, नामदेव जुमनाके,अजगर अली, सरपंच सिताराम मडावी, तिरुपती पोले, अमोल कांबळे, गणेश शेटकर,परशुराम पांचाळ, माधव डोईफोडे, प्रभाकर उईके, माधव शेंबळे, मुनीर शेख, जब्बार भाई, देविदास साबणे, बंडू राठोड, दत्ता गायकवाड, गणेश वाघमारे, काशिनाथ कोमले,प्रदीप काळे, वैजनाथ घुले, प्रदीप काळे, शंकर सोलंकर, मारू पाटील, शेख अब्बास, ताजुदीन शेख, जब्बार शेख, नवनाथ शेंबळे, किशोर चांदुरे, सुखदेव जोंधळे, बाबाराव कांबळे यांचेसह जिवती काँग्रेसचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये