वरोरा चंद्रपूर मुख्य मार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा टोल वसुली बंद करणार
आकाश वानखेडे यांचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नागपूर चंद्रपूर मुख्यमार्गावर जीव घेणे खड्डे तयार झाले आहे सतत तीन वर्षापासून हे खड्डे बुजवण्यासंदर्भात अनेकब्लास्ट वेळा नंदोरी टोल प्लाजा येथील व्यवस्थापक यांना लेखी निवेदन दिले मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे आता तीन दिवसात या मुख्य मार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा टोल वसुली बंद करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे यांनी दिला आहे.
वरोरा ते चंद्रपूर पर्यंत मुख्य महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहे त्यामुळे या तीन वर्षाच्या कार्यकाळात कित्येक दुचाकी स्वाराचा अपघात होऊन गंभीर दुखापती झाल्या तर कित्येकांचा जीव सुद्धा गेला आहे या खड्ड्याची दुरुस्ती करण्यात आली नाही तर असा जीवघेणा प्रकार सुरू राहणार आहे या मुख्यमार्गाच्या निर्मितीची मोठ्या प्रमाणात नंदोरी टोल प्लाझा मार्फत टोल वसुली केली जात आहे मात्र महामार्ग दुरुस्ती कडे दुर्लक्ष केले आहे तरी या तीन दिवसात नंदोरी टोल प्लाजा व्यवस्थापक आणि लक्ष देऊन या महामार्गाची दुरस्ती करावी.
अन्यथा संपूर्ण टोल वसुली बंद करून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा माजी उपाध्यक्ष तथा अध्यक्ष तंटामुक्ती समिती कडोली आकाश वानखेडे यांनी दिला आहे