ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिरांची सुरुवात

“नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान”

चांदा ब्लास्ट

महानगरपालिकेतर्फे चालविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा भाग म्हणून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम मनपा कार्यक्षेत्रातील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रात राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत १७ सप्टेंबर पासुन आतापर्यंत ६ शिबिरे यशस्वीरीत्या संपन्न झाली असून नागरिकांची स्वास्थ्य तपासणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

   त्याचप्रमाणे “नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान” देखील चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्रात दिनांक २४ सप्टेंबर पासून राबविण्यात येणार आहे.हे महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले एक राज्यव्यापी विशेष आरोग्य अभियान आहे.

ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत डोळ्यांची तपासणी व योग्य उपचार उपलब्ध करून देणे. ग्रामीण व शहरी गरीब लोकसंख्येत डोळ्यांच्या आजारांची योग्यवेळी तपासणी होत नाही, विशेषत: मोतीबिंदूसारखे आजार वेळेत लक्षात न आल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते. हीच गरज लक्षात घेऊन या अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे.

   मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व चंद्रपूर महानगरपालिका यांच्या समन्वयाने नेत्र तपासणी शिबिरे राबविण्यात येणार आहे.

नेत्रतज्ञांद्वारे नेत्र रोगासंबंधी प्राथमिक तपासणी करण्यात येणार असुन पुढील निदान,उपचार व शस्त्रक्रियेसाठी नेत्र विभाग,सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे संदर्भीत करण्यात येणार आहे. “नमो नेत्र संजिवनी स्वास्थ अभियान” मोफत नेत्र विकार निदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येत असुन ज्यास्तीत ज्यास्त नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपले नेत्रस्वास्थ्य तपासून घ्यावे, असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

शिबीरात प्रमुख तपासणी –

१) डोळ्यांचे प्राथमिक विकार तपासणी

२) चष्म्याचा नंबर तपासणी

३) मोतीबिंदू तपासणी

तपासणीसाठी कोणी यावे ? –

* डोळ्यांची जळजळ, सूज व सतत पाणी येणे.

* धूसर अथवा अस्वस्थ दृष्टी.

* हळूहळू अथवा अचानक दृष्टी कमी होणे.

* सतत डोकेदुखी प्रकाश भोवती वर्तुळे दिसणे.

* डोळ्यावर मास / पडदा येणे.

शस्त्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे –

* आधार कार्ड / ओळखपत्र

* रेशनकार्ड

* जुन्या तपासणीचे रिपोर्ट (असल्यास)

शिबिरांचे वेळापत्रक

शिबिरांचे आयोजन खालीलप्रमाणे करण्यात आले आहे –

२४ सप्टेंबर – आयुष्मान आरोग्य मंदिर केंद्र क्र. ७,आसरा, ट्रॅफिक ऑफिस चौक

२५ सप्टेंबर – केंद्र क्र. ४,बगडखिडकी

२६ सप्टेंबर – केंद्र क्र. ५, बाबुपेठ,नेताजी चौक

२७ सप्टेंबर – केंद्र क्र. ६, भिवापूर वॉर्ड

२९ सप्टेंबर – केंद्र क्र. ३, बालाजी वॉर्ड

३० सप्टेंबर – केंद्र क्र. १, इंदिरा नगर, मुल रोड

१ ऑक्टोबर – केंद्र क्र. ४, बगडखिडकी

सर्व शिबिरे सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत पार पडतील.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये