ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय दंड सहीतेच्या गुन्हयामध्ये कोर्टाचा दनदनीत निकाल

दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक २८/०७/२०१९ रोजी ११/३० वा. सुमारा आरोपी नामे १) अभिजित उर्फ छोटु सुरेंद्र उपाध्याय, रा. स्टेशन फैल वर्धा २) लोकेश राजेंद्र मुराई, रा. स्टेशन फैल वर्धा यांनी आपसात संगणमत करून फिर्यादीस अश्लिल भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याने पोलीस ठाणे वर्धा शहर येथे दाखल अपराध कमांक १२५४/२०१९ कलम २९४, ५०६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयांचा तपास पो. हवा./१४४२, कारभारी घुगे यांनी करून सदर गुन्हयांत आरोपीतांविरूद साधे पुरावे उपलब्ध करून दोषारोपपत्र मा. न्यायालयात दाखल करण्यात आलेले होते. सदर प्रकरणात मा. न्यायमुर्ती श्री. विकांत खंदारे, प्रथमवर्ग न्यायालय वर्धा, कोर्ट नं. १ यांनी साक्षदार यांना तपासुन आरोपी नामे

१) अभिजित उर्फ छोटु सुरेंद्र उपाध्याय, रा. स्टेशन फैल वर्धा २) लोकेश राजेंद्र मुराई, रा. स्टेशन फैल वर्धा

यांना कलम २९४, ३४ भा.दं.वि. मध्ये एक दिवसाचा न्यायालय उठेपर्यंत साधा कारावास व ३०० द्रव्य दंडाची शिक्षा, तसेच कलम ५०६, ३४ भा.दं.वि. मध्ये एक दिवसाचा न्यायालय उठे पर्यंत साधा कारावास व २०० द्रव्य दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास ०१ दिवसाचा साधा कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये