ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी आकाश वानखेडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील कडोली ग्रामपंचायत येथील तंटामुक्त अध्यक्ष पदाची दिनांक २९ रोजी शुक्रवारला ग्रामसभा घेण्यात आली . या सभेत आकाश वानखेडे यांची महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपदी बिविरोध निवड करण्यात आली
सदर निवड प्रक्रिया ग्रामपंचायत सरपंच शशिकला इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या ग्रामसभेला एकमताने आकाश वानखेडे यांची निवड करण्यात आली व त्यांचा कडे कडोली, किलोनी, कुरोडा या तीन गावाचा कारभार आहे. या ग्रामसभेला ग्रामपंचायत सचिव डोंगरे सोनाली फाडके , अजित फाडके , आडे तसेच ग्राम पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.