ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अवैध रेतीवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसुल विभागाची कारवाई
एक ब्रास रेती व ट्रॅक्टर जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अवैधरीत्या रेतीतस्करी करीत असलेल्या एका ट्रॅक्टरवर कारवाई करीत एक ब्रास रेती व ट्रैक्टर जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई भद्रावती महसूल विभागाद्वारे दिनांक ३० ला शहरातील जुन्या बसस्थानक परीसरात करण्यात आली.
महसूल विभागाचे गौण खणीज पथक गस्तीवर असताना एम.एच.३४ जी ७३६० या ट्रैक्टरच्या सहाय्याने रेतीची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली.
सदर ट्रैक्टर सुभाष शामराव गेडाम, राहणार मांगली यांच्या मालकीचे आहे. सदर कारवाई मंडळ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाद्वारे करण्यात आली.