कापूस हमी भावाने विक्री करण्यासाठी ऑन लाइन नोंदणी करणे आवश्यक _ सभापती अशोक बावणे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना – जिवती तालुक्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस विक्री करता आधार बेस नोंदणी सुलभ करण्यासाठी कापूस किसान ॲप विकसित करण्यात आले आहे.
भारतीय कापूस निगम लिमिटेड द्वारे नजीकच्या काही दिवसात कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे. दिनांक १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ च्या कालावधीत या ॲप द्वारे नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कापूस किसान ॲप डाऊनलोड करावा. त्यावर दिलेल्या प्रमाणे नोंदणी करावी. यासाठी चालू वर्षातील सातबारा पीक पेरा, आधार कार्ड, एक पासपोर्ट बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आदी बाबतची माहिती नोंदणी करावी. तसेच ॲप मध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे व माहिती अचूकपणे भरावी लागणार आहे.
शेतकऱ्यांना याविषयी काही अडचण आल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपणा व उपबाजार आवार गडचांदूर कार्यालयात संपर्क साधून माहिती घेता येईल. तरी या प्रक्रियेची नोंदणी शेतकऱ्यांनी करून घ्यावी असे आव्हान बाजार समिती सभापती अशोक बावणे उपसभापती वंदना बल्की , सचिव कवडू देरकर यांनी केले आहे.