महाऔष्णिक विद्युत केंद्रात हाताळणीतील (गॅन्ट्री) कोसळली
कार्यान्वित संचामधून मागील जवळपास ३९ वर्षांपासून अविरतपणे वीज निर्मिती चालू

चांदा ब्लास्ट
महाऔष्णिक विद्युत केंद्र हे सद्यस्थितीत २९२० MW स्थापीत क्षमता असलेले विदयुत निर्मिती केंद्र असुन या विद्युत केंद्रामध्ये ५०० MW चे ५ संच व २१० MW चे २ संच कार्यान्वीत आहेत. येथील संच क्र. ३ दि. १/४/१९८६ व ४ दि. ४/११/१९८६ पासुन कार्यान्वित असुन दोन्ही संचामधून मागील जवळपास ३९ वर्षांपासून अविरतपणे वीज निर्मिती चालू आहे.
चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र आपली कामगिरी व कार्यक्षमता उत्कृष्ट ठेवण्यासाठी सतत कार्यरत असतांना सुरक्षितते कडे देखिल विशेष लक्ष दिले जाते. परंतु काही तांत्रिक कारणामुळे दि. २९/८/२०२५ रोजी रात्री सुमारे २:०० वाजता संच क्रं.३ व ४ चे कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री खाली पडण्याची घटना घडली. सदर घटनेचे नेमके कारण जाणून घेण्याकरिता समिती गठीत करुन चौकशी व सखोल तपासणी करण्यात येईल.
सदर घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र या घटनेमुळे संच क्र. ३ येथील वीज निर्मिती थांबलेली असुन संच क्र. ४ चे वार्षिक देखभाल व दुरुस्तीचे काम आधीच चालु होते. सदर घटना घडल्यानंतर तात्काळ दुरुस्तीसाठी चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे पावले उचलली गेली असुन सदर काम लवकरात लवकर पुर्ण करुन संच कार्यान्वित करण्यात येईल.