ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात संविधान-७५ जागर उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत आहे.या औचित्याने संपुर्ण भारतात संविधान अमृत महोत्सव होते आहे.अनुगामी लोकराज्य महाअभियान अर्थात अनुलोम या सामाजिक संस्थेव्दारा राजुरा भागात संविधान-७५ जागर उपक्रम घेण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना संविधानातील मुलभुत कर्तव्याची जाणीव व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक मेश्राम गुरूजी, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सुष्मा दालवनकर अनुलोम उपविभाग प्रमुख चंद्रपूर,प्रमुख अतिथी विद्यालयाचे सह मुख्याध्यापक डाहुले गुरुजी, राजुरा भाग जनसेवक सतिश मुसळे, शाळेचे सहाय्यक शिक्षक हरिहर खरवडे गुरूजी उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक सुष्मा दालवनकर यांनी आपल्या संबोधनात संविधानातील सार्वभौमत्व विशद करून स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय या तत्वाची जाणिव पीपीडी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून दिली.सोबतच घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ आवाजाचे संबोधन विद्यार्थ्यांना ऐकविण्यात आले.

      यावेळी संविधान तत्वांवर आधारित प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून सोडवुन घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक हरिहर खरवडे गुरूजी यांनी केले.कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये