ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

31 ऑगस्ट रोजी देऊळगाव राजा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस कमेटी देऊळगाव राजा च्या वतीने 31 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता मी धावतो मत चोरी रोखण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे. मुले व मुली साठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून मुलांसाठी प्रथम बक्षिस 5000 रुपये, द्वितीय 3000 रुपये, तृतीय 2000 रुपये असून मुलींसाठी प्रथम बक्षिस 3100 रुपये, द्वितीय 2100 रुपये, तृतीय 1100 रुपये देण्यात येणार आहे.

सदर मॅरेथॉन स्पर्धा शिवाजी हायस्कुल ते माऊली पेट्रोल पंप, कुंभारी पर्यंत आयोजित केली आहे. मॅरेथॉन स्पर्धेत जास्तीत जास्त मुले व मुली यांनी सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आतिश कासारे व तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये