राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्षाला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. चंद्रमौली यांचे अध्यक्षतेखाली दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले.
इंडक्शन कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयामध्ये असलेले विविध अभ्यासक्रम,नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,राबविले जाणारे विविध उपक्रम व योजनांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत डॉ.संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ग्रंथालयाची माहिती प्रा. सोनटक्के यांनी दिली .रा.से.यो. बाबत कार्यक्रम अधिकारी प्रा वताखेरे यांनी माहिती दिली. महिला तक्रार निवारण कक्षाचे समन्वयक डॉ.कापगते यांनी महिला तक्रार निवारण कक्षाचे महत्त्व सांगितले. करियर गायडन्स व प्लेसमेंट सेल चे समन्वयक डॉ. बागडे यांनी विद्यार्थ्यांना या सेलची माहिती करून दिली.
विद्यार्थी कल्याण विभागाचे समन्वयक डॉ. वैराळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील अँटी रॅगिंग सेलचे समन्वयक डॉ. पाटील यांनी रॅगिंगच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. महाविद्यालयातून प्रकाशित होणाऱ्या मनोवेध या पुस्तका बाबत डॉ.वासेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगानंद बागडे तर प्रस्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए. चंद्रमौली यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी इंडक्शन प्रोग्राम चे समन्वयक प्रा. प्रशांत वासाडे व डॉ.प्रेरणा मोडक ,प्राध्यापक वृंद व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.