ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेवजाबाई भैय्या हितकारणी सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडपात बाप्पा विराजमान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

महाराष्ट्राच्या रांगड्या मराठमोळ्या संस्कृतीतील महत्त्वाचा सण म्हणून गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. देशाच्या बहुतांश भागांत गणेशोत्सव हा जवळजवळ राष्ट्रीय महोत्सव म्हणूनच साजरा केला जातो. विघ्नहर्त्या गणरायाच्या उत्सवाची प्रतीक्षा आबालवृद्धांना वर्षभर लागून असते. महाराष्ट्रात गणेशोत्सवाचे महत्त्व, महात्म्य आणि परंपरा अनन्य साधारण आहे. बुधवार 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी ला लंबोदर अनेक सार्वजनिक गणेश माडपाता विराजमान झाले. तसेच घरगुती गणेशमूर्ती विराजमान झाल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया.. मंगलमूर्ती मोरया.. असा जयघोष करीत, गणेश मुर्तीकाराच्या घरासमोर भक्तांनी केलेली गर्दी, चार चाकी खाजगी वाहनातून जाणारे घरगुती गणपती, गाडीतील स्पीकरवर ऐकू येणारी गणेश गीते, तर दुसरीकडे ढोल ताशांसह विविध वाद्यांचा गजर, यामुळे बुधवारी संपूर्ण ब्रह्मपुरी नगरी गणरायाच्या आगमनाने दुमदुमून गेली होती.
हिंदू धर्मात श्रीगणेशाला आराध्य दैवत मानले जाते. गणपती म्हणजे बुद्धी-समृद्धी सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्ता गणरायाची स्थापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीदिनी म्हणजे बुधवारला तालुक्यात झाली आहे. १० दिवसांच्या या मंगलमय सोहळ्याला बुधवारपासून प्रारंभ झाला आहे. ब्रह्मपुरी शहर व तालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपामध्ये गणपती बाप्पा मोठ्या थाटात विराजमान झाले आहेत.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून जोरात तयारी सुरू आहे. गणेशमुर्तीना साजेसा देखावा करण्यासाठी दिवसरात्र एक करणारे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यंदा उत्सवाच्या देखाव्यातून सामाजिक संदेश देणार आहेत. नेवजाबाई भैय्या हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाचे मंडपात मोठ्या भक्तीभावाने बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सकाळी ९.३० वाजता माजी नगरसेवक तथा प्रसिद्ध उद्योजक गौरव भैय्या व आशिता भैय्या यांच्या शुभहस्ते करण्यात आली. ब्रह्मपुरी शहर व तालुका भक्ती सागरात आकंठ बुडाला आहे. या मंडळामध्ये मूर्तीचे पवित्र अबाधित राखण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी कार्यमग्र राहणार आहेत. नेवजाबाई भैय्या हितकारिणी शिक्षण संस्थेच्या परिसरात यावर्षी भव्य आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आकर्षक मूर्ती आणि प्रेक्षणीय चित्रफिती स्वरूपात देखावा यासाठी हे मंडळ प्रसिद्ध आहे. मंडळाने लोकांच्या मनोरंजनासाठी व ईश्वर भक्तीभावासाठी वातावरण निर्माण केलेले आहे. त्यामूळे बाहेरगावी कामानिमित्त गेलेले चाकरमानी मोठ्या संख्येने आपापल्या गावात दाखल होत आहेत. शहरातील बाजारपेठाही खरेदीसाठी हाऊसफुल्ल झाल्या असल्याचे पहावयास मिळत आहे. महिनाभरापासूनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बाप्पांच्या आगमणासाठी लगबग सुरू होती.
वातावरण आणि उन्हाचे चटके दिवसभर ढगाळ सहन करत अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले आहे. येत्या दहा दिवसांपर्यंत प्रत्येक घराघरात आरती, स्त्रोत, भजन, मंत्रपठण असे मंगलमय वातावरण पहावयास मिळणार आहे. ‘श्रीं’च्या आगमणाने बच्चे कंपनी व अबालवृद्धांचा आनंद नक्कीच द्विगुणीत झाला आहे. नेवजाबाई भैया हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळाच्या बाप्पांची पहिली छबी टिपण्यासाठी तर काही ठिकाणी बाप्पांसोबत सेल्फी काढण्यासाठी तरूणांची झुंबड उडली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये