ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीपासून गणेश मूर्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना, पर्यावरण सेवा योजना, इको क्लब व नगरपरिषद गडचांदूरच्या वतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव या शीर्षकाखाली शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याची स्पर्धा आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी घेण्यात आली.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी श्री प्रदिप परसुटकर, पसेयो कार्यक्रम अधिकारी प्रा सचिन भैसारे, इको क्लबचे अधिकारी प्रा नरेंद्र हेपट व नगरपरिषद गडचांदूर येथील पठाण सर व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व इको क्लबचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.