ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कापुस हमी भावाने विक्री करणेसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक

समाधान शिंगणे, सभापती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगांव राजा बाजार समितीचे कार्यक्षेत्रातील व परीसरातील शेतकरी बांधवांनी कापुस हंगाम सन 2025-26 साठी हमी भावाने सिसिआई ला कापुस विक्री करणेसाठी स्वतःचे मोबाईल ने नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरची नोंदणी ही दिं. १ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये कपास किसान या मोबाईल अॅपव्दारे स्वतः नोंदणी करावी लागते. दिं.३०/०८/२०२५ पासुन गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल ios स्टोअर वरुन कपास किसान अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे.

मागील वर्षीचे कापुस हंगामामध्ये बाजार समितीने शेतकरी बांधवांचे सोईसाठी सिसिआई चे अधिकारी यांचेमार्फत बाजार समिती कार्यालयांत ऑनलाईन नोंदणी करुन सर्व शेतकरी बांधवानां ऑनलाईन करणेची सुविधा उपलब्ध करुन दिली होती व त्यानुसार जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात समिती यार्डात कापुस विक्रीसाठी आणला होता.

तरी सर्व कापुस उत्पादक शेतकरी बांधवांनी दिं. ०१/०९/२०२५ ते ३०/०९/२०२५ पर्यंत नोंदणी करुन घ्यावी. जे शेतकरी बांधव ऑनलाईन नोंदणी करतील त्यांचाच कापुस सिसिआई खरेदी करणार आहे म्हणुन सर्व शेतकरी बांधवांनी हमी भावाने कापुस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी.

तसेच हमी भाव योजनेचा लाभ व्हावा म्हणुन शेतकरी बांधवांनी गावामध्ये कापुस विक्री न करता मार्केट यार्डात विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. समाधान शिंगणे, उपसभापती श्री. दादाराव खार्डे व संपूर्ण संचालक मंडळाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये