एस एन डी टी महिला विद्यापीठात गणेशोत्सवाची रंगत
कला स्पर्धेचे आयोजन : विविध गणेश प्रतिकृतींनी सजले एस.एन.डी.टी. चे बल्लारपूर आवार

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर :- २७ ऑगस्ट ला श्रीगणेशाचे आगमन झाले त्या निमित्त एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात गणेश फ्रेम मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून छोटुभाई पटेल हायस्कूल चे कला शिक्षक व सुप्रसिद्ध ललित कलाकार श्री सुदर्शन बारपत्रे उपस्थित होते.
२७ ऑगस्टला देशभरात गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. श्री गणेशाचे कलाकृतीच्या माध्यमातून स्वागत या पार्श्वभूमीवर एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवार महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल,बल्लारपूर येथे ‘म्युरल अँड लिप्पन आर्ट गणेश फ्रेम मेकिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत अमिक्षा हर्षे, श्रेया रंगारी व श्रुती सुरकर यांच्या संघाने प्रथम पारितोषिक पटकावले तर कोमल आगलावे, मिना राऊत , साक्षी पुणेकर यांच्या संघाने द्वितीय पारितोषिक पटकावले व हनी कडेल, उत्कर्षा पोहळे, देविका बारसागडे यांच्या संघाने तृतीय पारितोषिक पटकावले.
एखादी कलाकृती ही त्या कलाकाराच्या भावना व त्याच्या केलेल्या परिश्रमाचा आरसा असतो म्हणून कलेत पारंगत होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे.उत्तम सादरीकरणासाठी कोणत्याही स्पर्धेत सहभागी होताना त्याविषयीचे संशोधन गरजेचे आहे असे वक्तव्य देत श्री.सुदर्शन बारपत्रे यांनी विविध कलाप्रकारांची माहिती दिली . बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ.राजेश इंगोले यांनी आपल्या भाषणातून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत स्पर्धा व त्यात सहभाग घेण्याचे महत्व सांगितले.
बक्षीस वितरण समारंभप्रसंगी श्री सुदर्शन बारपत्रे, बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ.राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड, समन्वयक डॉ .वेदानंद अलमस्त,श्री.अथर्व बारपत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सह.प्राध्यापिका प्रियंका मूलचंदानी यांनी व आभार सह.प्राध्यापिका निहारिका सातपुते यांनी मानले.कार्यक्रमात प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थिनींनी उपस्थित होत्या.