ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कवठाळा येथे दोन सरपंचासह शेकडो कार्यकर्त्याचा भाजप पक्ष प्रवेश.

आमदार देवराव भोंगळे यांचा नेतृत्वात भाजप मध्ये इन्कमिंग सुरूच

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

  शेतकरी संघटनेचे युवा नेते, उद्योजक व बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट तसेच कवठाळा येथील सरपंचा रुपाली बोबडे व पवनदिप यादव यांनी कवठाळा, कोराडी, पालगाव, बाखर्डी गावातील आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह कवठाळा येथे झालेल्या भाजप पक्ष प्रवेश कार्यक्रमात जाहीरपणे प्रवेश केला.

  “सबका साथ,सबका विकास,सबका सन्मान,याप्रमाणे पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल,.कोणत्याही जनहिताच्या कामात,काही अडचण येत असेल तर,अर्ध्या रात्रीसंपर्क करावा,भाजप पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” अशी विश्वासात्मक ग्वाही आमदार देवरावदादा भोंगळे यांनी यावेळी दिली.मी जनतेला सांगितल होत,मी आमदार झालो तर, माझ्या मतदार संघाच्या प्रत्येक माणसाला वाटल पाहिजे मी आमदार आहो. हा विश्वास तुमच्या मनामध्ये निर्माण करायचं आहे. असे आपुलकीचे मत यावेळी दादांनी व्यक्त केले.ऐवढ्या मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इन्कमिंग पाहून ‘त्यांना’ धडकी भरली असा मिश्किल टोलाही आमदार भोंगळे यांनी लगावला.

 कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भाजप हा खर्‍या अर्थाने शेतकरी, कामगार व सामान्य जनतेचा पक्ष आहे. विकास आणि पारदर्शक कारभार हेच पक्षाचे ध्येय असून शेतकऱ्यांचा सन्मान व हक्काची हमी हीच पक्षाची ओळख आहे.

स्थानिक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजप हा सर्वोत्तम पर्याय आहे.

   अरुण रागीट व रुपाली बोबडे यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, ते भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर, विकासात्मक दृष्टिकोनावर आणि आमदार देवरावदादा भोगळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन पक्षात दाखल झाले आहेत.यापुढेही ग्रामविकास, शेतकरी कल्याण आणि तरुणांच्या प्रगतीसाठी ते अविरतपणे काम करत राहतील असे त्यांनी नमूद केले.

    याप्रसंगी विवेक बोढे भाजपा जिल्हा महामंत्री, संजय मुसळे अध्यक्ष भाजपा तालुका कोरपना, अरुण मडावी जिल्हा अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती, वामन तुराणकर अध्यक्ष भाजपा तालुका राजुरा, सतीश उपलेंचवार भाजपा तालुका महामंत्री,पुरुषोत्तम भोंगळे भाजपा उपाध्यक्ष कोरपना,भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,अरुण डोहे भाजपा शहर अध्यक्ष गडचांदूर, हितेश चव्हाण, अमोल आसेकर भाजपा शहर अध्यक्ष कोरपना, ओम पवार, अशोक झाडे, निखिल भोंगळे, प्रमोद कोडापे, दिनेश खडसे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कोरपना, दिनेश ढेंगळे, नांदा उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, संजय नित, सचिन नांदे, मोमिन शेख, व तालुक्यातील सर्व भाजपा पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  या भव्य पक्ष प्रवेशामुळे परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी बांधव व विविध सामाजिक घटकांतील नागरिकांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये