ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
घुग्घुस : मतदार यादीतील भोंगळ कारभारावर काँग्रेसची टीका

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : शहरातील मतदार यादीत प्रचंड प्रमाणात भोंगळ कारभार होत असल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी एकाच घरात अनेक मतदारांचे पत्ते दाखविण्यात आले असून त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
या प्रकारामुळे मतदारांची खरी ओळख पटविण्यात अडचणी येत असून बोगस मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेकडे मागणी केली आहे की, शहरातील प्रत्येक घरावर स्पष्टपणे घर क्रमांक लिहिण्यात यावा.
त्यामुळे मतदार यादीत अचूक पत्ता नमूद करता येईल, मतदारांची खरी ओळख पटेल तसेच बोगस मतांवर आळा घालता येईल. याबाबत राजुरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर यांना निवेदन सादर केले आहे.