कोरपना येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
युवा प्रतिष्ठानचे आयोजन ; वेगवेगळ्या देखाव्याने वेधले नागरिकाचे लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :- युवा प्रतिष्ठान कोरपनाच्या वतीने तान्हा पोळा कोरपना येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात उत्साहात साजरा करण्यात आला. या तान्हा पोळ्यात तालुक्यातील मोठ्या संख्येने बालगोपालांनी नंदीबैल आणले होते.
या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक विजयराव बावणे, कोरपना नगराध्यक्ष नंदाताई बावणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बावणे, कोरपनाचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उत्तमराव पेचे, भारत चन्ने, विशाल गजलवार, अविनाश मुसळे, मनोहर चन्ने, वहाबभाई,जम्मू सेठ, इस्माईल शेख, राजाबाबू गलगट, पुंडलिक गिरसावळे, सुरेश मालेकर स्पर्धेच्या परीक्षक रेवती लोडे, सलमा बी कुरेशी, कल्याणी चांदुरकर आदी उपस्थित होत्या.
या तान्हा पोळ्यात विविध सामाजिक देखाव्यांचे सादरीकरण करण्यात आले होते. तान्हा पोळ्यात नंदीबैल सजावट व फॅन्सी ड्रेस वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती. यात प्रथम पारितोषिक ऋत्विक अक्षय कोटावार, द्वितीय वृणव श्रीकांत आसुटकर, तृतीय अधिरा अनुप रणदिवे, चतुर्थ विहान चव्हाण, पंचम वीरेन जगदीश पेटकर यांनी पटकाविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बावणे, संचालन प्रशांत लोडे तर आभार तुषार बावणे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी युवा प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली.