20 पटसंख्याचे आत असणाऱ्या शाळा बचाव मोहीम कोरपणा तालुक्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
दिनांक 23 ऑगस्ट 2025 शिक्षण बचाव सन्मय समिती ता. कोरपना जि. चंद्रपूर द्वारा कोरपना तालुक्यातील 37 जिल्हा परिषद शाळा 20 पटसंख्या चे आत असणाऱ्या शाळा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होत आहे.
त्या शाळा बंद होऊ नये म्हणून तालुका अध्यक्ष मंडळाचे समन्वयक श्री हरिदास गौरकार यांनी 37 जिल्हा परिषद शाळेचे गावातील सरपंच व व्यवस्थापक समिती पदाधिकाऱ्याचे नावानी पोस्टाद्वारे व प्रत्यक्ष गावाला भेटी देऊन ग्राम सभेचे ठराव व व्यवस्थापन समितीचे ठराव तसेच प्रत्येक शाळेतील पटसंख्या असलेल्याची माहिती गोळा करण्याकरिता आजच्या बैठकीत निर्णय घेऊन दिनांक 30 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत दैनंदिनी दौरा कार्यक्रमाचे नियोजन करून प्रत्येक शाळाची गावांना भेटी देण्याचे ठरवले आणि यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री यु जी. तडस सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक कोरपना तसेच प्रभाकर गेडाम, हरिदास गौरकार, बालाजी शिंदे, प्रेमदास मेश्राम, सुधाकर तुरांकार, विलास मडावी, वामन बोढाले, बाळकृष्ण देवतळे, गोविंद हेरेकुमरे, बंडुजी कुडमेथे, विलास सोयाम, श्रीधर मालेकर, तुकाराम जाधव यांच्या उपस्थितीत ठरवाचा निर्णय घेऊन श्री हरिदासजी गौरकार यांच्या पत्नी दुर्गाबाई बाई यांचा पहिला स्मुर्ती दिवस चंद्रपूर येथे घेण्याचा दुसरा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण बचाव सन्मय समितीची कार्याची वाटचाल चालू आहे या निमित्याने दिनांक 23 ऑगस्ट रोज शनिवार ला कोरपना येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपस्थित हरिदास गौरकार, प्रभाकर गेडाम, बालाजी शिंदे लोणी सुधाकर तुरांकर हेटी, गोविंद हेरेकुमरे चिंचोली, बाळकृष्ण देवतळे सोनुर्ली, यु जी तडस कोरपना (सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक) वामन पा. बोढाले, विनायक खरवढे सोनुर्ली, विलास मडावी इंजापूर, विलास सोयाम अकोला, प्रेमदास मेश्राम गडचांदूर, श्रीधर कोरपनामालेकर कोरपना, तुकाराम जाधव कोरपना, बंडुजी कुडमेथे इत्यादी ची उपस्थिती होती.