ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तान्हा पोळ्यात साकारली उडान पुलाची प्रतिकृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना – कोरपना येथील तान्हा पोळा उत्सवात यंदा खास आकर्षण ठरली नव्याने बांधण्यात आलेल्या राजूरा–आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील उडान पुलाची प्रतिकृती.
ही कलात्मक प्रतिकृती कोरपना येथील मेधांशी जयंत जेनेकर हिने साकारली असून, तिच्या कल्पकतेचे आणि कलाविष्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उत्सवात बैलजोड्यांसोबत सजावट, कृषी साहित्याच्या प्रतिकृती आणि पारंपरिक रचना सादर करण्यात आल्या. मात्र, उडान पुलाची आकर्षक प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांची विशेष गर्दी झाली.
आधुनिक विकासकामे आणि पारंपरिक सण यांचा सुंदर संगम या प्रतिकृतीतून दिसून येतो.