सिंदखेड राजा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जनता विद्यालय सावखेड तेजन येथील सन 1978-79 च्या दहावी च्या बॅचचा सहकुटुंब ऐतिहासिक स्नेहमिलन मेळावा 21 ऑगस्ट रोजी सिंदखेड राजा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल 47 वर्षांनंतर सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र करणे फार जिकरीचे काम होते सेवा.निवृत्त कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले आणि हा कार्यक्रम घडवून आणला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होता यावे यासाठी हा मेळावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन मुख्याध्यापक श्री.टी. एन.विघ्ने होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये विज्ञान शिक्षक श्री नामदेव वाकोडे, लिपिक आनंदा मांटे, मातोश्री लॉन्स चे मालक शिवाभाऊ ठाकरे हे होते.
प्रमुख पाहुणे यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले,अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर 47 वर्षांमध्ये दिवंगत झालेले त्या वेळचे काही शिक्षक व वर्गबंधू यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.नंतर उपस्थित सर्व मित्रांचा सहकुटुंब ट्रॉफी, गिफ्ट व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी आपला परिचय सुद्धा दिला.या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे सहकुटुंब वर्गबंधू व भगिनी 60 वर्षा वरील ज्येष्ठ नागरिक होते. श्री टी एन विघ्ने माजी मुख्याध्यापक, नामदेव वाकोडे , एकनाथ सोनुने, गोविंद मांटे, शिवाजी विघ्ने, उत्तम खजुरे, श्रीराम बुधवत, नंदू बाहेती, यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकनाथ सोनुने यांनी सादर केलेली “पार्टी नको मित्रा तुझी,येऊन फक्त भेटत जा ही पु ल देशपांडे यांची कविता आकर्षण ठरली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंद मांटे, एकनाथ सोनुने, शिवाजी विघ्ने,श्रीराम बुधवत,मधुकर उबाळे,उत्तम खजुरे, भीमराव सोनुने, सर्जेराव अचलखांब,भानदास ढाकणे,नंदलाल खार्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे बहरदार सूत्रसंचलन एकनाथ सोनुने से.निवृत्त जिल्हा व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक यांनीकेले तर आभार प्रदर्शन मधुकर उबाळे से.निवृत्त मुख्याध्यापक यांनी केले