ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगारांसाठी ‘निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर’

एस.एन.डी.टी. विद्यापीठ व युथ भारती फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर :_ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ बल्लारपूर केंद्राच्या भव्य इमारतीचे बांधकाम चंद्रपूर शहराजवळील विसापूर येथे केएमवी प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. बांधकाम पूर्ण करण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांसाठी गुरुवार, २५ सप्टेंबर ला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिर महिला विद्यापीठाचे बल्लारपूर केंद्र महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण व ज्ञानसंकुल, बल्लारपूरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत युथ भारती फाउंडेशन, नागपूर व प्लॅन इंडिया वन स्टॉप सेंटर, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क स्वरूपात आयोजित करण्यात आले होते .एकूण 80 बांधकाम कामगार व कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरात केलेल्या विविध तपासण्या

१. व्हायरल हेपेटायटीस बी आणि सी साठी तपासणी

२. यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्य चाचण्या (एलएफटी/केएफटी)

३. थायरॉईड प्रोफाइल (एफटी३/एफटी४/टीएसएच)

४. कंप्लीट ब्लड काउंट (सीबीसी)

५. व्हीडीआरएल/एचआयव्ही

६. एसटीआय तपासणी

७. टीबी तपासणी

८. रक्तदाब

९. रक्तातील साखरेची चाचणी

१०. सीए १९.९ (पॅन्क्रिएटिक कॅन्सर)

११. पीएसए

उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, प्रमुख अतिथी डॉ. सुशील मुंधडा (दंतचिकित्सक व सल्लागार समिती सदस्य,एस एन डी टी.बल्लारपूर), डॉ.पार्थ बदकल ( प्लान इंडिया वन स्टॉप सेंटर), मा.महिमा डोंगरे(उपअभियंता,सा.बां.विभाग, बल्लारपूर), मा.शिशुकुमार (कंत्राटदार), डॉ.बाळू राठोड (सह कुलसचिव, बल्लारपूर आवार), डॉ.वेदानंद अलमस्त(समन्वयक, बल्लारपूर आवार), मा.सागर हेमके(समुपदेशक,प्लान इंडिया वन स्टॉप सेंटर)इत्यादी उपस्थित होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणातून डॉ.राजेश इंगोले यांनी तपासणी शिबिरसाठी कार्यरत सर्वांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व असे समाजोपयोगी कार्ये करण्यास कायम सज्ज रहा असे आवाहन केले. डॉ.वेदानंद अलमस्त यांनी प्लान इंडिया वन स्टॉप सेंटर,चंद्रपूर च्या सर्व मेडिकल टीम चे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे संचालन सह प्रा.नेहा जीवतोड व आयोजन तसेच आभार सह प्रा.श्रद्धा किन्नाके यांनी केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये