ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दिनांक 28 नोव्हेंबरला स्त्रियांचे उद्धार कर्ते,सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे विद्यार्थ्यांना आव्हान केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक महेंद्रकुमार ताकसांडे प्राध्यापक जहीर सय्यद यांनी सुद्धा ज्योतिबा फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन कुमारी ज्योती चटप यांनी केले तर आभार कुमारी भुवनेश्वरी गोपमवर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता विद्यालयातील शिक्षक सुरेश पाटील, जी.एन. बोबडे, माधुरी उंमरे, भालचंद्र कोंगरे,बी. एस. मरसकोल्हे, श्रीमती शेंडे मॅडम,वसेकर सर, बापूजी मेश्राम,लीलाधर मत्ते व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये