ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जि. प. लालगुडा शाळेत ‘माझे संविधान, माझा अभिमान’ उपक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे भारतीय संविधान दिवसाचे औचित्य साधून ‘माझे संविधान,माझा अभिमान’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.

भारतीय संविधानातील मूलतत्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमा मागील मुख्य विषय होता. दिनांक:25 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत या उपक्रमांतर्गत शाळेत वक्तृत्व स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

दि. 26 नोव्हेंबर ला सकाळी नऊ वाजता गावातून संविधान सन्मान रॅली काढण्यात आली व शाळेमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील नागरिक यांनी भारतीय संविधानातील  उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे, शिक्षक गोविंद पेदेवाड तथा विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये