ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुरात संविधान दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शाखा गडचांदुर जिल्हा चंद्रपूर च्या वतीने गडचांदूर शहरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला व मुंबई ला सव्वीस अकराला आतंकी हमला मध्ये शहीद वीर झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.

 याप्रसंगी डॉ. हेमचंद्र दुधगवळी व प्रा. विजय आकनुरवार यांनी भारतीय संविधान दिनाबद्दल व सव्वीस अकराच्या प्रसंगाबदल मार्गदर्शन केले व शहीद झालेल्या वीर जवानांना उपस्थित सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी जगदीश ठावरी,दिवाकर नावडे,रोहित दुरतकर, अश्विनी नावडे, सविता जेणेकर,रुषाली मेश्राम, संजय राठोड, जगदीश धवने,राहुल पोधार,महेंद्र नागोशे,अविनाश माहुरे, प्रणित निवालकर, निखील उरकुडे,आकाश शेंडे, राहुल तेलजीर, आकाश रोहणे, दिपक देवकते आदि उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये