ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर येथे पोळा निमित्त बैल सजावट स्पर्धा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

ग्रामपंचायत लखमापूरच्या माध्यमातून बळीराजाचा सन्मान व्हावा, व लोकांमध्ये बैलांविषयी प्रेम व त्यांना सजावटीचे प्रोत्साहन मिळावे. पोळा संस्कृतीचे जतन व्हावे. यासाठी ज्या शेतकऱ्यांचे बैल उत्कृष्ट सजवून राहतील अशा सात बैलजोडींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक श्री गुलाब पा. जोगी, द्वितीय क्रमांक श्री गणेश भोयर, तृतीय क्रमांक श्री गणेश थिपे तर चौथा क्रमांक एकनाथ प्रा. वडस्कर यांनी पटकावला. ग्रामपंचायतचे सरपंच अरुण जुमनाके व उपसरपंच संभाजी पाटील टेकाम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ग्रामपंचायतचे सर्व सभासद उपस्थित होते. आणि सर्व लखमापूर गावकरी यांच्या उपस्थितीत हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये