ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपूर नगर परिषदद्वारे आयोजित महा संस्कृती महोत्सव

प्रेक्षकाना लक्की ड्रा मध्ये फ्रिज व मिक्सर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- बल्लारपूर शहराला सहाशे वर्ष झाल्याने व शिवजयंती असल्याने 17 फरवरी ते 20 फरवरी पर्यंत महा संस्कृती महोत्सवचे आयोजन सांस्कृतीक कार्य विभाग तर्फे नगर परिषद बल्लारपूर ने आयोजित केला आहे.जुना तालुका क्रीडा संकुल गौरक्षण वॉर्ड (FDCM)ग्राऊंडवर साय, सात ते दहा वाजेपर्यंत चार दिवस जल्लोष कार्यक्रम राहणार आहे.

17फरवरी 2024 ला प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंग स्वर संध्या यांचा कार्यक्रम तर 18फरवरी रोजी वाघ नृत्य, शिव महिमा नृत्य व गर्जा महाराष्ट्र माझा नाट्य.19फरवरी ला शिवजयंती मोहोत्सव.आझादी 75(नाट्य)अशोक हांडे यांचे सुप्रसिद्ध प्रस्तुत देश भक्तीवर महा नाट्य आणि 20 फरवरी ला संस्कार भारती महा नाट्य 500 कलाकारांना घेऊन नागपूर ग्रुप सादर करणार आहे नागरिकांनी पाहण्यासाठी निशुल्क लाभ घ्यावा सोबतच प्रेक्षक यांना फ्री लक्की ड्रा चा माध्यमातून रोज एक फ्रिज व पाच मिक्सर यश इंटरप्राईजेस यांचा कडून देण्यात येत आहे.

अशी माहिती बल्लारपूर नगर परिषद चे प्रशासक व मुख्यध्याकारी विशाल वाघ यांनी दिली 17ते 20पर्यंत चे सर्व कार्यक्रम जुना तालुका क्रीडा संकुल गौरक्षण वॉर्ड (FDCM )ग्राऊंडवर आयोजित करण्यात आले शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी महा संस्कृती मोहोत्स लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक व मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये