नक्षलग्रस्त क्षेत्रातील जिल्हा परिषद हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा अतिरिक्त घरभाडे भत्ता संदर्भात टॅब उपलब्ध करून देण्याचे दिले आदेश
शिक्षक परिषदेच्या सततच्या पाठपुराव्याला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नक्षलग्रस्त क्षेत्रात कार्यरत जिल्हा परिषद हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक शाळा मधील शिक्षकांसाठी अतिरिक्त घरभाडे भत्ता प्रदान करण्यासाठी शालार्थ प्रणाली मध्ये टॅब उपलब्ध करून देण्याचे आदेश शिक्षण संचालक माध्यमिक पुणे महेश पालकर यांनी पवन जोशी बिझनेस ॲनॅलिस्ट मुंबई यांना नुकतेच दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चुनारकर व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अमोल देठे यांनी दिली आहे .
घरभाडे भत्ता टॅब अनुषंगाने लेखाशिर्ष 22020531-36,22020549-36 व 22020558 उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ने या संदर्भात विशेष प्रयत्न केल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळामधील शिक्षकांनी आभार मानले आहे.
मार्च 2023 पासून अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब कोणतेही कारण न देता राज्यस्तरावरून अचानकपणे बंद करण्यात आली होती.याविषयी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ने राज्यस्तरावर पाठपुरावा सुरू केला. या संदर्भात शिक्षक परिषदेच्या वतीने वारंवार निवेदने पाठवलीत. चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार करण देवतळे, माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी विशेष लक्ष घालून हा विषय मार्गी लावला.
शिक्षक परिषदेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या संदर्भात विवेक जाॅन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिनांक 8 एप्रिल 2025 ला अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक यांना पत्र पाठविले.पत्राच्या अनुषंगाने रितसर कार्यवाही शिक्षण संचालक माध्यमिक पुणे यांनी आँनलाईन टॅब सुरू करण्याचे संबंधितांना आदेश दिलेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ने याप्रश्नी विशेष लक्ष घालून विषय निकालात काढल्याबद्दल जिल्ह्यातील शिक्षकांनी समाधान व्यक्त केले असून परिषद पदाधिकारी राजेश सुर्वे, प्रकाश चुनारकर, विलास बोबडे, अमोल देठे, विलास खाडे,अजय बेदरे, संजय लांडे, विजयालक्ष्मी पुरेड्डीवार,सुशांत मुनगंटीवार, योगिनी दिघोरे, किशोर मुन,राजेंद्र पांडे,सतीश दुवावार,दिनेश टिपले, दिलीप राठोड, गणेश प्रधान,नरेंद्र चौखे,सतीश डांगरे,सुंदर धांडे,सुनिल टोंगे, आनंदराव वेलादी, विजय नळे तसेच कार्यकारणी सदस्य यांनी समाधान व्यक्त केले आहे.