ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालयात जागतिक योग दिनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय, गडचांदूर व महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक 21/06/2023 ला जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले.महात्मा गांधी विद्यालय,गडचांदूर चे शारीरिक शिक्षक श्री बबन भोयर यांनी विविध योगासने व प्राणायाम प्रात्यक्षिकांद्वारे करून दाखविले व त्याचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेंद्र देव, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता चिताडे, उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे, उपप्राचार्य श्री.प्रफुल्ल माहुरे,पर्यवेक्षक श्री.एच. बी. मस्की तथा सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये