ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रीयन संस्कृतीचा ढोल ताशांचा डंका आता वाजत आहे साता समुद्रापार

“गुरुगर्जना ढोल-ताशा गुरुकुलाचा अमेरिकेत गजर!”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण – गुरुगर्जना ढोल-ताशा गुरुकुलाचा अमेरिकेत झालेला गजर!

महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून नोकरी निमीत्ताने अमेरिकेत स्थाईक झालेल्या मराठ मोळी कुटुंबांनी एकत्र येत गुरू गर्जना ढोल ताशा पथकाची स्थापना केली

अलीकडेच या पथकाला Orlando Disney Resort येथे झालेल्या Ascend Engage या भव्य तीन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात वादन करण्याचा सन्मान मिळाला. हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर भारतीय परंपरेचा, संस्कृतीचा आणि ऐक्याचा जागतिक पातळीवरील गौरवशाली क्षण होता.

श्री गजानन महाराज, साईनाथ, स्वामी समर्थ यांच्या नामाने ढोल-ताशांचा गजर सुरू झाला आणि पुढील प्रत्येक बीटने हजारो प्रेक्षक भारावून गेले. वातावरणात भक्ती, आनंद आणि अभिमान एकत्रित झाला — “आम्ही भारतीय आहोत, आम्ही गुरुगर्जना आहोत!” अशी हाक प्रत्येक ठोक्यातून उमटली.

आमचं ध्येय – का?

गुरुगर्जना गुरुकुल फक्त एक ढोल ताशा पथक किंवा संगीत वा तालासाठी नाही, तर एका मोठ्या उद्देशासाठी कार्यरत आहे. आम्ही ढोल-ताशांचा आवाज हा समाजासाठी, मानवतेसाठी आणि वंचित मुलांच्या भविष्यासाठी वापरण्याचा संकल्प केला आहे.

 • वेश्याव्यवसायात जन्मलेल्या मुलांचे शिक्षण

 • उपासमारीमुळे शाळेबाहेर राहिलेली मुलं

 • लैंगिक अत्याचारातून गेलेली मुलं

 • अनाथ मुलं

या सर्वांसाठी निधी उभारणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्य देणे, हेच आमचं ध्येय आहे.

आमचं कार्य – काय?

आम्ही अमेरिकेत भारतीय महाराष्ट्रीयन ढोल-ताशा परंपरेचे सादरीकरण करतो. सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव, सार्वजनिक सोहळे, शाळा-कॉलेज उपक्रम अशा विविध मंचांवर आमचं गुरुकुल सहभागी होतं.

प्रत्येक कार्यक्रमातून मिळालेली देणगी आणि सहाय्य थेट वंचित मुलांसाठीच्या कार्याला दिली जाते.

आमची वाटचाल – कशी?

 • सदस्य प्रशिक्षण: शिकण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

 • सहभाग: विविध वयोगटातील लोक वाद्य शिकतात, सराव करतात आणि समाजकार्यात सामील होतात.

 • प्रभाव: प्रत्येक ताल हा केवळ ताल नसून समाजपरिवर्तनाचा संदेश आहे.

आमचं स्वप्न

“One Beat at a Time – प्रत्येक तालाने जीवन बदलणे”

२०३० पर्यंत १ मिलियन डॉलर निधी गोळा करून तो संपूर्णपणे या वंचित मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वापरणे.

शेवटी

गुरुगर्जना ढोल-ताशा गुरुकुलासाठी प्रत्येक कार्यक्रम हा केवळ सांस्कृतिक सादरीकरण नाही, तर भारतीय परंपरेचा गौरव, समाजकारणाचा आधार, आणि मानवतेचा ध्यास आहे.

ढोल-ताशांच्या प्रत्येक गजरासोबत आम्ही प्रेम, एकता आणि सेवा यांचा संदेश देत राहनार आहेत. या ढोल ताशा पथक मध्ये सोनाली सुर्वे,राजेश सुर्वे, ओम सुर्वे, आकांक्षा सुर्वे, अश्विनी महेश देशमाने (इंगळे) सारा महेश देशमाने, अभिषेक चिकने, राधिका चिकने, मिहिका चिकने, अस्मिता नगरकर, अमित नगरकर, अक्षित नगरकर,सौरभ, सोहल वैद्य, ऋतुजा थट्टे, अमित लूनावत, अश्विनी लुनावत, सान्या लूनावत, प्रज्वल पाटिल,मनोज वाजेकर यांनी सहभाग नोंदविला, या पथकाने साता समुद्रापार केलेल्या कामगिरीमुळे अख्या महाराष्ट्राची मान उंचावली आहे एव्हढे माञ निश्चित…

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये