कुंभेझरी मार्गावरील पुलावरील काँक्रिट गेले वाहून

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील कुंभेझरी मार्गावरील लोलडोह व पाटागुडा पुलावरील सिमेंट काँक्रिट वाहून गेल्याने त्यावरील लोखंडी रॉड उघडे पडले आहेत.त्यामुळे पुलावरून जाणे येणे करणे व टू व्हीलर, फोर व्हिलर या वाहन चालकांना जिवितास धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. हा मार्ग तालुक्यावरून तेलंगणा, व आंध्रप्रदेश, व मराठवाडा, कडे जाणारा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे अनेक नागरिक याच मार्गाने जाणे येणे करतात.मोठ्या संख्येने वाहनाची वर्दळ चालू असते. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची व वाहनाची वर्दळ सतत चालूच असते. या संदर्भात सार्वजनिक बांधकामा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा पूल प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या विभागाकडे आहे तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यावर ते सांगतात की,
हा पूल आमच्याकडे नाही ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे त्यामुळे दोन विभागाच्या कचाट्यात या पुलाचे काम बऱ्याच वर्षापासून रखडले असल्यामुळे यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून तोडगा काढतील का? याकडे या भागातील नागरिकांचे लक्ष लागले. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, व प्रधानमंत्री ग्राम सडक विभाग या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या पुलावरील सिमेंट काँक्रिटचे काम तात्काळ सुरू करावे. व खडे बुजवावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
यावेळी उपस्थित प्रा. सुग्रीव गोतावळे,भानुदास जाधव, रमाकांत कांबळे, विष्णू अम्पले,नागेश देवाले. डॉ. पांडुरंग भालेराव, विजय गोतावळे, अनिल बसवंते आदी उपस्थित होते.