भद्रावतीत काँग्रेस व उबाठा गटाच्या माजी नगरसेविका शिवसेना शिंदे गटात
पालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट अधिक बळकट, काँग्रेस-ठाकरे गटाला धक्का

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती नगरपरिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका जयश्री दातारकर तसेच उबाठा गटाच्या रेखा खूटेमाटे आणि सुनीता टिकले यांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला.
हा प्रवेश सोहळा शिवसेना लोकसभा संघटक मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात, राज्याचे वित्त, नियोजन व कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते दहीहंडी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पार पडला.
२०१८ च्या नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षासह तब्बल १६ नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते. शिवसेनेचे भद्रावती नगरपरिषदेवर तब्बल दोन दशकांपासून वर्चस्व राहिले आहे. २०२३ पासून परिषद प्रशासकांकडे आहे.
विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढलेल्या मुकेशभाऊ जिवतोडे यांना नगरसेवकांनी दिलेली साथ निर्णायक ठरली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला, तर पुढे १२ नगरसेवकांनी मुंबईत प्रवेश करून शिंदे गटात ताकद वाढवली होती.
आता झालेला हा नवीन पक्षप्रवेश काँग्रेस व ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असून, आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गटाने आपली पकड अधिक मजबूत केली असल्याचे स्थानिक राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी शिवसेना पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव, लोकसभा संपर्क प्रमुख मंगेश काशीकर, जिल्हाप्रमुख बंडू डाखरे, युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षल शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे ,कामगार सेना जिल्हाप्रमुख गुलाम सिद्दिकी, चंद्रपूर महानगर प्रमुख भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, नकुल शिंदे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, शहर प्रमुख पप्पू सारवण, माजी नगरसेवक सुधीर सातपुते, राजू सारंगधर, चंद्रकांत खारकर, प्रमोद गेडाम, अनिता मुडे, शोभा पारखी, शीतल गेडाम, प्रतिभा सोनटक्के, आशा निंबाळकर, प्रदीप वडाळकर, नगरसेवक दिनेश यादव, सुधाकर मिलमिले,संदीप मेश्राम,महेश जीवतोडे,सुषमा भोयर,प्रणाली मेश्राम,तथा वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील सर्व माजी नगरसेवक,पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.