अल्पवयीन बालीकेवर ४२ वर्षीय नराधमाचा अत्याचार : आरोपी अटकेत
तालुक्यातील मुधोली गावातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मुधोली गावात ११ वर्षीय अल्पवयीन बालीकेवर ४२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोपीचंद आत्राम वय ४२, रा. मुधोली याने अल्पवयीन बालीकेवर अत्याचार केला. घटनेच्या वेळी पीडितेचे आईवडील शेतात कामासाठी गेलेले असल्याने ती घरी एकटी होती. ही संधी साधून आरोपीने तिच्या घरात घुसून अत्याचार केला.
संध्याकाळी आईवडील घरी आल्यानंतर मुलीने त्यांना संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर तातडीने मुलीच्या आई वडिलांनी भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय केदारे, पीएसआय मुळे व पोलिस करीत आहेत.