ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मनोहर हनवते यांची चौंथ्यांदा अविरोध निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती  तालुक्यातील आदर्श सांसद ग्राम चंदनखेडा येथे दिनांक २०ऑगस्ट रोजी विठ्ठल हनवते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या ग्रामसभेत चंदनखेडा येथे मनोहर हनवते यांची सर्व संमतीने व सर्वानुमते महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामसभेत सरपंच नयन जांभुळे, ग्रामसेवक, पोलिस पाटील समिरखान पठाण, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिभा दोहतरे, रंजना हनवते, बंडुजी निखाते, यांच्यासह ग्रामस्थ फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभा आटोपताच मनोहर हनवते यांचे जोरदार स्वागत करुन गुलाल उधळण्यात आला.

याप्रसंगी माजी उपसरपंच विठ्ठल हनवते, संतोष खडतकर,सिंगलदिप पेंदाम,लोकेश कोकुडे,राजु धात्रक, मंगेश हनवते, अमर बागेसर, गणेश हनवते,दिलिप कुळसंगे,रामा दोहतरे,शरद श्रीरामे,अजय भोयर, गजेंद्र रणदिवे, संतोष हनवते,कदिर पठाण,अजय मुडेवार, कुणाल ढोक, महेश केदार, नंदकिशोर जांभुळे, अमोल दडमल,सौरभ दडमल, हेमराज उरकांडे,बालाजी महागमकार,मयुर दडमल, आशिष हनवते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये