जुनासुर्ल्यात पोळा उत्सव स्पर्धांच्या रंगात

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत ग्रामपंचायत जुनासुर्ला तर्फे बैलपोळा व तान्हा पोळा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समिती मूल व जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा होणार असून, यामध्ये शेतकऱ्यांना व नागरिकांना पृथ्वी, जल, वायु, अग्नी व आकाश या घटकांवर आधारित पर्यावरण विषयक संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे नियम व गुणपद्धती बैलपोळा स्पर्धेत बैलजोडी व सजावट यासाठी १० ते २० गुण, तर सजावटीतून पर्यावरणविषयक संदेश देण्यासाठी १० ते ५० गुण देण्यात येणार आहेत. तान्हा पोळा स्पर्धेत नंदी बैल व सजावट यासाठी १० ते २० गुण, तर पर्यावरण विषयक संदेशासाठी १० ते ५० गुण देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धेचे एकूण १०० गुणांचे मूल्यमापन केले जाईल. दोन दिवसीय स्पर्धेसाठी प्रत्येकी तीन बक्षीस ग्रामपंचायत जुनासुर्ला मार्फत जाहीर करण्यात येतील तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने भाग घेण्याचे आवाहन सरपंच रंजीत समर्थ, उपसरपंच राजेश गोवर्धन, गणेश खोब्रागडे व ग्रामपंचात सदस्यांनी केले आहे.