मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे पालक सभा आयोजित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
दिनांक 19 ऑगस्ट 2025 ला पालक सभा घेण्यात आली या पालक सभेचे अध्यक्ष माननीय प्राचार्या असमा खान मॅडम तसेच उपाध्यक्ष पालक वर्ग मधून नवल चव्हाण सर तसेच सचिव मंजू वर्मा ताई आणि सीमा ठाकूर ताई या उपस्थित होत्या, यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला माल्या अर्पण व दीप प्रज्वलन करून पालक सभेची सुरुवात झाली या पालक सभेमध्ये मंचावरील मान्यवरांचे स्वागत झाले तसेच या सभेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती यावर सविस्तर माहिती सुनीता मॅडम यांनी दिली तसेच बालकाचे संरक्षण शिस्त, पोक्सो कायदा याबाबत याबद्दल सविस्तर माहिती सुरावर मॅडम यांनी दिली तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकाराची माहिती गैरवर्तन तक्रार ही चिराग ॲप द्वारे कशा प्रकारे केली जाते यावर सविस्तर माहिती वनिता मॅडम यांनी दिली त्यानंतर सायबर गुन्या पासून कसे सुरक्षित रहावे.
याबाबत सरिता मॅडमनी माहिती दिली, दहावीच्या परीक्षेबद्दल मार्गदर्शन मीना मॅडम यांनी केले शाळेची शिस्त क्रीडा सांस्कृतिक कार्यक्रम यावर सविस्तर रित्या शाळेच्या प्राचार्यांनी अध्यक्ष पदी भाषणात मार्गदर्शन केले, मीना मॅडम यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन ज्योती खोके मॅडम यांनी केले.
या पालक सभेला मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.