गडचांदूर मध्ये निघाली अमली पदार्थ विरोधी अभियान रॅली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
पोलिस स्टेशन गडचांदूर आणि महात्मा गांधी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली, महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणातून निघालेली रॅली शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत महात्मा गांधी विद्यालय येथे विसर्जित करण्यात आली. रॅली मध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, व्यसन मुक्तीचे संदेश देणारे फलक विद्यार्थी च्या हाती होते,व्यसन मुक्ती झालीच पाहिजे, भारत माता की जय, या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला, पोलिस निरीक्षक शिवाजी कदम यांनी आपल्या भाषणात अमली पदार्थांचे सेवन करू नये, विद्यार्थ्यांनी नशेली पदार्थापासून दूर रहावे, अमली पदार्थांच्या सेवनामुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहे असे सांगितले.
या प्रसंगी उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे, उप मुख्याधापक विजय डाहुले, संजय झाडे, प्रशांत धाबेकर, संतोष मुंगुले, रवी रामटेके, तथा विद्यार्थी उपस्थित होते