यंदाही होणार चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन
खरेदीदार भाग्यवान विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसे

चांदा ब्लास्ट
केवळ न्यू इंग्लिश स्कूल जवळील विक्रेत्यांना आहे परवानगी
चंद्रपूर :- आगामी श्रीगणेशोत्सव काळात यंदाही चांदा क्लब येथे श्री गणेश मूर्ती प्रदर्शनी व विक्रीचे आयोजन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले असुन श्री गणेश मूर्ती दुकानांवर होणाऱ्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये व नागरिकांना सहजतेने मूर्ती खरेदी करून घरी नेता याव्या या दृष्टीने नियोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त विपीन पालीवाल यांनी सांगितले.
लवकरच गणेशोत्वास सुरवात होणार असुन मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात अधिकांश घरी गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. मूर्ती विक्री करणारे अनेक मूर्तिविक्रेते हे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी गणेशमूर्तीची विक्री करत असल्याने नागरिकांना मूर्ती खरेदीस गर्दीच्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नसतो.यावर उपाय म्हणुन यावर्षी मागील वर्षी प्रायोगिक तत्वावर चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा मनपाने उपलब्ध करून दिली होती व त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. यावेळॆस मागणी असल्याने सिटी हायस्कूल जवळील जुन्या विक्रेत्यांना आहे परवानगी देण्यात आली आहे,मात्र त्याशिवाय इतर फुटपाथ अथवा रस्त्यावर विक्रेत्यांना पूर्णपणे मनाई आहे.
चांदा क्लब येथे येथे व्यवस्था करण्यात येणार येणार असुन स्टॉल्स, पेंडॉल व्यवस्था मूर्ती विक्रेत्यांना स्वतः करावयाची आहे. विद्यूत व्यवस्थेसाठी पॉईंट, फिरते शौचालय,स्वच्छतेची व्यवस्था,पाणी टँकर मनपा प्रशासनातर्फे करून दिली जाणार आहे. नोंदणी न करता मूर्ती विक्री व साहित्य विक्री करणाऱ्यावर तसेच मनपाने निश्चित करून दिलेल्या जागेशिवाय इतरत्र विशेषतः फुटपाथवर अथवा रस्त्यावर मुर्ती विक्री करून रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
मूर्ती खरेदीस नागरिकांची गर्दी, वाहनांची गर्दी, खरेदीस पुरेसा वेळ न मिळणे, दुचाकी वाहन सोबत असेल तर वाहन उभे करायला जागेचा प्रश्न,चारचाकी वाहन असेल तर सुरक्षित जागी वाहन उभे करून खरेदीस दूर पायी चालत जावे लागते.सोबत परिवाराचे सदस्य असतील तर खरेदी करतांना होणारा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. चांदा क्लब येथील प्रशस्त मैदानावर मूर्तिकारांना मूर्तिविक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने एकाच जागी मातीच्या गणेश मूर्तीची अनेक दुकाने उपलब्ध होणार असुन नागरिकांना इतरत्र कुठेही गर्दीच्या जागी न जाता मोकळ्या जागेत आपल्या परिवारासहित खरेदीचा आनंद घेता येणार आहे.
चांदा क्लब येथील मूर्तिकांरांकडून मूर्ती विकत घेणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉ कुपन दिले जाणार असुन यातील 8 भाग्यवान विजेत्यांना घरगुती उपयोगी वस्तु इस्त्री, मिक्सर स्वरूपाची बक्षिसे मिळणार आहेत. गर्दीमुक्त मोकळ्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन होण्याच्या दृष्टीने नागरिकांनी चांदा क्लब येथुन मूर्ती खरेदी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.