एस एन डी टी महिला विद्यापीठात स्वातंत्रदिन सोहळा
मा. कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट
एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबई च्या बल्लारपूर आवारात 15 ऑगस्ट चा स्वातंत्रदिन सोहळा उत्साहात पार पडला. विद्यापीठाच्या कुलगुरू (प्रा.) डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड उपस्थित होते.
कुलगुरू (प्रा.) डॉ. उज्वला चक्रदेव यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनात विद्यार्थिनींना देशभक्ती, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, “स्वातंत्र्य ही केवळ एक ऐतिहासिक घटना नसून ती आपल्या प्रत्येक कृतीतून जपायची एक जीवनशैली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या ज्ञान, कौशल्य आणि प्रामाणिक प्रयत्नांद्वारे देशाच्या प्रगतीस हातभार लावला पाहिजे.”
तसेच, शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रीशक्तीला सक्षम करून समाजातील बदल घडवणे हीच खरी देशसेवा असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे विचारांची स्वतंत्रता, निर्णयक्षमतेचा आत्मविश्वास आणि समाजहितासाठी निःस्वार्थी सेवा, असेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी संचालन प्रा. अपेक्षा पिंपळे व आभार बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त, प्रा. सोनकुसरे सर, डॉ. प्राची साठे तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.