ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वतंत्रदिनी आदर्श विद्यालयात विद्यार्थी,पालक व शिक्षक प्रबोधन कार्यक्रम संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देगलूर तालुक्यातील टाकळी(जहागीर) येथील आदर्श विद्यालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त्य विद्यार्थी,पालक व शिक्षक प्रबोधन कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. सकाळी ध्वजारोहण व प्रभात फेरी झाल्यानंतर प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संत सेवालाल महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता सरस्वती प्रतिमा पूजन,पुष्पहार तसेच दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुंदर सामुहिक स्वागत गीत व समुह देशभक्ती नृत्याने वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मूळचे नांदेड जिल्हयातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे श्रीपतभाऊ राठोड होते. शिक्षण क्षेत्रातील कर्तव्यदक्ष,कर्मठ सेवानिवृत्त अधिकारी मा.मोतीराम राठोड यांची प्रमुख उपस्थिती व मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.शंकर किशनराव राठोड हे होते.विशेष वैशिष्ट्य असे की, वसंत बहार या इंग्रजी पुस्तिकेच्या लेखिका डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज,दिक्षाभूमी, नागपूर येथे अकरावीत शिकणाऱ्या कु.दिपाली राठोड यांची उपस्थिती व इंग्रजी भाषेतील भाषण कार्यक्रमात चर्चेचा विषय ठरला.

“उज्ज्वल भविष्या सोबत राष्ट्रनिर्मिती कार्यासाठी विद्यार्थी,पालक व शिक्षक यांच्यात योग्य समन्वय,सुसंवाद व मुक्त चर्चा असणे अत्यावश्यक असल्याचे आणि गरजेचे असून आनंददायी शिक्षण पद्धतीतून आमुलाग्र परीवर्तन घडविणे शक्य असल्याचे विचार प्रामुख्याने श्रीपतभाऊ राठोड यांनी या प्रसंगी आवर्जून प्रतिपादन केले.स्वरचित कविता,गीतांच्या प्रात्यक्षिकातून अधिक समर्पकपणे यशस्वीरित्या कृतितून दाखवून दिले हे विशेष उल्लेखनिय आहे. कार्यक्रमात पालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

कार्यप्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन माजी विद्यार्थीनी कु.शुभांगी तोटावार यांनी केले.प्रास्ताविक सह शिक्षक श्री.डी.एल. मुद्गुरे यांनी पार पाडले.कार्यक्रमाचे संकल्पक व मुख्य संयोजक शाळेचे क्रियाशिल विद्यार्थी,शिक्षक व पालकप्रिय मुख्याध्यापक मा.प्रल्हाद नाईक (जाधव) यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. अध्यक्षीय समारोप मा.शंकर राठोड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.एस.बी. सगर, श्री.पवार,श्री.केंद्रे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

आभार प्रदर्शन शिक्षक श्री.पल्लेवाड यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.राष्ट्रगीतानंतर शाळेच्या भव्य पटांगणावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोप कार्यक्रम घेवून शाळेच्या वतीने सहभोजन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये