चंद्रपूर मतदार संघातील भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० हजार राख्यांद्वारे दिला विश्वासाचा संदेश
जैन भवनात भाजपच्या वतीने भव्य रक्षाबंधन सोहळा

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या महिला आघाडीच्या वतीने आज शुक्रवारी जैन भवन येथे रक्षाबंधन सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या विशेष सोहळ्यात चंद्रपूर मतदारसंघाच्या वतीने पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या मार्फत तब्बल ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आल्या. भगिनींनी मुख्यमंत्री यांच्याप्रती असलेला विश्वास, प्रेम आणि संरक्षणाची भावना या उपक्रमातून व्यक्त केली.
या कार्यक्रमाला आदिवासी विभाग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार, माजी आमदार अनिल सोले, भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबु वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, नामदेव डाहुले, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, वंदना हातगावकर, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुले, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, अॅड. सारिका संदुरकर, स्वप्निल डुकरे, अरुण तिखे, अॅड. राहुल घोटेकर, माजी नगरसेविका कल्पना बबुलकर, पुष्पा उराडे, शितल आश्रम, शितल गुरनूरे, वनिता डुकरे, वंदना तिखे, सायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री अशोक उईके म्हणाले कि, रक्षाबंधन हा भगिनींच्या सन्मान आणि सुरक्षिततेचे प्रतीक आहे. आज चंद्रपूरच्या भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० हजार राख्या पाठवून आपला विश्वास व्यक्त केला आहे, हा क्षण अभिमानाचा आहे. मुख्यमंत्री स्वतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहेत. राज्य सरकार महिलांच्या शिक्षण, आरोग्य, स्वावलंबनासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, भगिनींचा विश्वास हा माझ्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आज या कार्यक्रमातून भगिनींनी केवळ आमच्याच नाही तर थेट मुख्यमंत्री यांच्याप्रती विश्वासाचा पवित्र धागा पाठवून एक सुंदर संदेश दिला आहे. आमच्या लाडक्या ताईंच्या सुरक्षिततेसाठी, न्यायासाठी आणि सन्मानासाठी आम्ही प्राथमिकतेचे काम करू, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
या कार्यक्रमात लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी राखी बांधून सणाचे महत्त्व अधोरेखित केले. अखेरीस ३० हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्याची औपचारिक घोषणा करत हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. विशेष म्हणजे अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या वतीने ही 2 हजार राख्या मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आल्यात. या कार्यक्रमाला महिला भगिनींची शेकडोंच्या संख्येने उपस्थिती होती.