
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- तालुक्यातील अर्हेरनवरगाव येथील अरुण तुळशीराम ठेंगरे( 53 )हा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.15 ऑगष्ट ला उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार सदर व्यक्ती हा दि.14 ऑगष्ट ला सकाळी 4 वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शौचास गावाबाहेरील तलावाच्या पाळीवर गेला होता. मात्र दिवसभर घरी न आल्याने जिकडे तिकडे शोधाशोध घेण्यात आला मात्र अरुण चा शोध लागला नाही दि.15 ऑगस्ट ला सकाळी 6.30 च्या सुमारास गावाजवळील तलावात त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने गावात एकाच खळबळ माजली असून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे अर्हेरनवरगाव बिट जमादार अरुण पिसे यांनी आपल्या टीम सह सदर मृतदेह ताब्यात घेतले व पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथी नेण्यात आले.
मृतक अरुण हा घरचा कर्ता व्यक्ती असल्याने ठेंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या पश्चात पत्नी,मुले व बराच आप्त परिवार आहे.