ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद बल्लारपुर मार्फत स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, देशभक्तीपर स्पर्धा,भव्य मॅरेथॉन स्पर्धा

"हर घर तिरंगा हर घर स्वच्छता"अभियानांतर्गत आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

“हर घर तिरंगा हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत नगर परिषद बल्लारपुर मार्फत स्वच्छता मोहिम

हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या उपक्रमा अंतर्गत तसेच स्वातंत्र्य दिनाला ७६ वर्ष पूर्ण झाले. हे औचित्य साधुन बल्लारपुर नगर परिषदेच्या वतीने गोंड राजे खांडक्या बल्लाळशाह बाबा समाधी आणि गणपती घाट या परीसरात दिनांक ०७/०८/२०२५ ला स्वच्छता अभियान राबविण्यात आले, स्वच्छता अभियान या उपक्रमामुळे लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमामध्ये नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी उत्साहाने सहभाग घेतला, या उपक्रमाचे नेतृत्व प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले. त्यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार तसेच प्राणवायु फॉऊंडेशन (NGO) सुद्धा उपस्थित होते.

“हर घर तिरंगा” अभियानातून हरित संदेश नगर परिषद बल्लारपूर तर्फे वृक्षारोपण

देशभर “हर घर तिरंगा” अभियानाच्या निमिताने देशभक्ती व पर्यावरण प्रेमाचा सुंदर संगम बल्लारपूरमध्ये पाहायला मिळाला. नगर परिषद बल्लारपूरतर्फे शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

या उपक्रमात प्राणवायू फाउंडेशन ने विशेष सहकार्य करत हिरवाई वाढविण्याच्या संकल्पाला बळ दिले. नगर परिषद मुख्याधिकारी श्री. वाघ सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात, विविध छायादार व फुलझाडांच्या रोपांचे लागवड करण्यात आले.

“प्रत्येक घरासमोर एक तिरंगा फडकावा आणि प्रत्येक परिसरात एक झाड फुलावे, हीच खरी देशसेवा आहे.” असे आवाहन मा. मुख्याधिकारी विशाल वाघ यांनी केले आहे सादर मोहिमे अंतर्गत प्राणवायू फाउंडेशनचे अध्यक्ष सौरभ वानखेडे यांनी सांगितले की, “एक झाड लावणे म्हणजे अनेक प्राणांना जीवनदान देणे. हा संदेश प्रत्येकाने मनापासून स्वीकारावा.” कार्यक्रमात नगर परिषद अधिकारी-कर्मचारी, प्राणवायू फाउंडेशनचे स्वयंसेवक व स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले. शेवटी सर्वांनी वृक्षांची योग्य देखभाल करण्याची शपथ घेतली.

“हर घर तिरंगा हर घर स्वच्छता” अभियानांतर्गत भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन बल्लारपुर नगर परिषदे मार्फत हर घर तिरगा अभियान अंतर्गत बल्लारपुर शहरामध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजन दिनांक १२/०८/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजता नगर परिषद कार्यालयातुन काढण्यात आली.

सदर यात्रेची सुरवात नगर परिषद कार्यालया पासुन काटा गेट, नविन बस स्टैंड, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मार्गे परत नगर परिषद कार्यालयामध्ये संपन्न झाली. बल्लारपुर शहरामधील आयोजीत करण्यात आलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धाचे मुख्य उद्देश शहरामधील नागरीकांमध्ये देशभक्तीचे महत्व पटवून देणे व शहरामधील स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या चोर क्रांतीकारका प्रती कृतज्ञता व्यक्त करणे संबंधाचा उपक्रम आहे. हे लक्षात घेता शहरातील नागरीकांनी सदर स्पर्धेकरीता उत्फुर्त योगदान दिले. प्रत्येकाच्या मनामध्ये असणारी देशभक्ती या कार्यक्रमाच्या माध्यमातुन वृद्धोगत होत असल्याने या कार्यक्रमामध्ये नागरीक सहभागी झाले. नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रभागामधील देशभक्तीपर कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.

सदर भव्य मॅरेथॉन स्पर्धा अभियानांत न.प. चे सर्व अधिकारी/कर्मचारी तथा मोठ्या संख्येने बल्लारपुर शहरातील नागरीकांनी सहभाग नोंदविला तसेच सदर अभियानात सहभागी होऊन सदर भव्य मॅरेथॉन स्पर्धा अभियान यशस्वी राबविण्याबाबत श्री. विशाल वाघ प्रशासक तथा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांनी संपुर्ण अधिकारी/कर्मचारी तथा बल्लारपुर शहरातील नागरीकाचे अभार व्यक्त केले.

हर घर तिरंगा” अभियानांतर्गत नगर परिषद बल्लारपूरतर्फे शाळांमध्ये देशभक्तीपर स्पर्धेचे आयोजन

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमिताने “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत नगर परिषद बल्लारपूरतर्फे शहरातील विविध शाळांमध्ये देशभक्ती जागवणाऱ्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत शाळेच्या भिंती सजविणे, तिरंगा रांगोळी स्पर्धा, तिरंगा प्रश्नमंजुषा, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा प्रतिज्ञा, तसेच “हर घर तिरंगा” मोहिमेसाठी स्वयंसेवक कार्य यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. शाळांच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये तिरंग्याच्या रंगांनी सजलेले दृश्य देशभक्तीची भावना उंचावणारे ठरले.

या सर्व उपक्रमात प्राणवायू फाउंडेशन नेही आपला मोलाचा हातभार लावल कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत देशभक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. कार्यक्रमात मा. विशाल वाघ, मुख्याधिकारी नगर परिषद, बल्लारपूर तसेच अधिकारी-कर्मचारी, प्राणवायू फाउंडेशनचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीमध्ये देशप्रेमाची भावना बळकट होते, असा विश्वास व्यक्त केला

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये