शहरातील जनसेवा करणा-या ऑटोरिक्षा चालकांना महिलांनी राखी बांधून साजरा केला रक्षाबंधन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरातील अहोरात्र जनतेच्या सेवेकरीता उपलब्ध असणा-या सर्व ऑटोरिक्षा चालकांना रक्षाबंधानानिमित्त स्थानिक गांधी चौक येथे महिलांतर्फे राखी बांधण्यात आली. चंद्रपूर शहरातील ऑटोचालक महिला व इतर प्रवास्यांच्या मदतीकरीता दिवसरात्र रस्त्यावर धावत असतात.
प्रसंगी महिलांच्या सेवेसाठी सुध्दा सदैव तत्पर असतात. या सर्व देशसेवेच सन्मान करणा-या ऑटोचालकांचे आभार वजा रक्षण करण्याचे वचन घेत शहरातील बहिणींनी सर्व ऑटो चालकांना राखी बांधून असेच बहिणींचे रक्षणासाठी सदैव तत्पर व सेवेत रहावे अशी भावना महिला भगिनींकडून व्यक्त करण्यात आली. काही ऑटो चालक हे गर्भवती महिलांना दवाखान्यात पोहोचविण्याकरीता निशुल्क सेवा सुध्दा देत आहेत, त्यांचे हे कार्य अतिशय कौतुकास्पद असे कार्य ऑटो चालक सदैव करीत असतात.
उन्हाळ्यात प्रवास्यांना थंड पाण्याची व्यवस्था ऑटो चालक आपल्या ऑटोमध्ये करुन एक प्रकारे ते देशवासच करीत आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या मनीचा खरा अर्थ ऑटो चालक आपल्या कृतीतून वापर करीत असतात. या सर्व जनसेवेचे व महिलांच्या रक्षणाचे उपकाराची परतफेड करण्याकरीता शहरातील महिलांनी ऑटोरिक्षा चालक बांधवांना राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष विनोद चन्ने, सचिव सुनिल धंदरे, मंगेश चवरे, सुधाकर बिसने, सविता कांबळे, चंद्रकला सोयाम, संगीता खांडेकर, शिला चव्हाण, मनिषा महातव, माला कातकर, रेखा ठाकरे, सुमित्रा बोबडे व असंख्य महिलांची व ऑटोरिक्षा चालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.