स्व. कालिदास अहीर यांच्या जयंती दिनानिमित्त २५१ रक्तदात्यांचे रक्तदान
हंसराज अहीर यांनी मानले रक्तदात्यांचे आभार

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर – सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे स्व. कालिदास अहीर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही अहीर परिवार, स्व. कालिदास अहीर प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात 251 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
चंद्रपूर येथील जैन भवन मध्ये पार पडलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन दीप प्रज्वलन व स्व. कालिदास अहीर यांच्या प्रतिमेस माल्यार्पणाने पार पडले. या कार्यक्रमास डॉ. अशोक जिवतोडे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चिंचोलकर, डॉ. राजू सैनानी, डॉ. कीर्तिवर्धन दिक्षित, डॉ. गोपाल मुंधडा, डॉ. कदम, डॉ. चिताडे, दामोदर मंत्री, हरिश्चंद्र अहीर, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, रविंद्र गुरनुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. ज्येश्ठ विधीतज्ज्ञ रविंद्र भागवतजी यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. यावेळी हंसराज अहीर यांनी त्यांचे स्वागत केले.
आपल्या मनोगतात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी समाजातील गोरगरीब, गरजु, वंचित रूग्णांना तसेच गंभीर रूग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे ही या कार्यक्रमामागील भावना असल्याचे सांगितले. स्व. कालीदास अहीर हे सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे युवा नेतृत्व होते. त्यांच्या कार्याला उजाळा देण्याकरिता गेली 19 वर्षे रक्तदान शिबीर आयोजित केले जात असल्याचेही ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनी अहीर कुटूंबियांच्या सामाजिक योगदानाबद्दल गौरवपुर्ण शब्दात प्रशंसा केली. या रक्तदान शिबीरात चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, बल्लारशाह, जिवती, कोरपना, राजुरा, वणी, पांढरकवडा, घुग्घूस व अन्य शहरातील रक्तदाते सहभागी झाले होते.
समारोपीय कार्यक्रमास वरोराचे आमदार करण देवतळे, माजी आ. सुदर्शन निमकर, विजय चोरडीया, सुभाष कासनगोट्टूवार, डॉ. जीवने, डॉ. नरेंद्र कोलते, पवन एकरे, विनोद शेरकी, तुषार सोम, प्रकाश देवतळे, मोकाशीजी, वणीचे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुशाल बोंडे यांनी तर मंच संचालन विकास खटी यांनी केले.
यावेळी हंसराज अहीर, विनय कालीदास अहीर, अजय कालीदास अहीर व मान्यवरांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व भेट वस्तू देवून सन्मानित करण्यात आले तसेच लाईफलाईन ब्लड बॅंक नागपूरचे डॉ. अपर्णा सागरे यांचे व सहकारी तसेच शासकीय रूग्णालय, चंद्रपूरचे रक्तसंक्रमण विभागातील डॉ. मिलींद झाडे, डॉ. ललीत घोगरे, डॉ. अर्पित दाभाडे यांचे व सहकाऱ्यांचा सुध्दा भेट वस्तू देवून सन्मान करण्यात आला.
या रक्तदान शिबीरास राजेंद्र अडपेवार, राजु घरोटे, किशोर बावने, अरुण मस्की, सुनिल उरकुडे, विठ्ठल डुकरे, शाम कनकम, विनोद खेवले, राजेंद्र खांडेकर, प्रा. रवि जोगी, रवी लोनकर, प्रदिप किरमे, बाळू कोलनकर, शंकर लालसरे, संजय तिवारी, विनोद चौधरी, सुदामा यादव, पुनम तिवारी, गौतम यादव, जगदिश दंडेले, शिलाताई चव्हाण, छबूताई वैरागडे, रेणूकाताई घोडेस्वार, श्रीनिवास सुंचूवार, दिनकर सोमलकर, श्रीकांत भोयर, संजय खनके, सुभाष आदमने, राजु येले, जुम्मन रिजवी, मधुकर राऊत, निलेश खोलापूरे यांचेसह भाजपा, भाजयुमो व महिला आघाडीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.